अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याची अशी ही डाकपेटी आता एक तारखेपासून बंद होणार. सतत ही बातमी व्हाट्सअप वरती वेगवेगळ्या ग्रुप मधून फिरत आहे. वाचून नक्कीच खूप हुरहुर वाटत आहे. याचे कारण लहानपणी ततच्याबद्दल असणारे एक आकर्षण, कुतूहल आणण नकळत तनमाषण झालेला एक प्रकारचा भावतनक बंध. माझे वडील पोस्टातच नोकरी करत होते त्यामुळे तर अगदी ववशेर् जिव्हाळा. नेहमी काही ना काही कारणाने पोस्ट ऑफिस मध्ये िाणे होत असे. पोस्टाच्या दारातच एक भलीमोठी टपालपेटी होती. कधी कधी पोस्टमन काका ततच्यातील टपाल काढत असताना मी ततथे उभी राहून बघायची. मला ते पाहताना खूप मिा वाटायची.
अथाषत काळाची गरि ओळखून, यंत्र युगाला अनुसरून पोस्ट ऑफिसच्या कायषपद्धतीमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल होत आहेत हे खरे आहे आणण काळानुसार ते स्वीकारले पाहहिेत हे पण तेवढेच खरे आहे. तरी पण न कळत एखाद्या वस्तूबद्दल एक हळवा कोपरा मनामध्ये असतोच, अनेक गोड आठवणी पण असतात. त्यामुळे अचानक आता टपाल पेटीचे पूणष उच्चाटन होणार हे
थोडेसे हुरहुर लावणारे वाटले. अगदी आपल्या घरातली फकंवा मनातली व्यक्ती आपल्याला सोडून दूर चालली आहे असाच भास होत आहे.
मला आठवते, आमच्या लहानपणी, अगदी एक दोन तीन गल्ल्या सोडून, सगळीकडे प्रत्येक कोपऱ्याला टपालपेट्या, अगदी लाल परी सारख्या, डोक्यावर काळी टोपी घालून उभ्या असत. त्यांच्या पोटाला एक कुलूप असायचे. त्यावेळी घरातील मंडळी पण बऱ्यापैकी पत्रव्यवहार करत असत. तेव्हा ते पत्र पोस्टाच्या पेटीत मी टाकणार, का तू टाकणार? यावरून आमच्या भावंडांमध्येच बरेच वाद व्हायचे. मग िो उंच असायचा तो िास्ती भाव खायचा आणण आमच्या हातातून टपाल ओढून घेऊन तो त्या पेटीमध्ये टाकायचा. बरोबर एका ठराववक वेळी सायकल वरून पोस्टमनकाका यायचे कुलूप उघडायचे. त्याच्या पोटातील सवष पत्रे एका मोठ्या पोत्यासारख्या वपशवी मध्ये घालायचे. वपशवी बंद करायचे. सायकलच्या समोरच्या हँडलला अडकवायचे, फकंवा पाठीवर टाकायचे आणण पुन्हा ततला कुलूप लावून तनघून िायचे. पेटीच्या पोटावरती पुन्हा ती पेटी कधी उघडले िाईल याची वेळ
पण ललहहलेली असायची. त्या त्या गावचा वपनकोड नंबर पण पेटीवर ललहहलेला असायचा.
आम्ही शाळेमध्ये एकमेकींना िी कोडी घालायचो त्याच्यामध्ये ‘लाल माझा झगा, काळी माझी टोपी, खाते मी कागद पोटभर’,’ पाय नाही पण प्रवास करतो, िीभ नाही पण बोलत राहतो, ओळखा पाहू मी कोण?’ अशी कोडी नेहमी असायची. टपाल पेटीचे आत्मवृत्त असा तनबंधाला पण ववर्य यायचा. वावर्षक परीक्षेचे तनकाल सुद्धा त्यावेळी पोस्टाने यायचे. अगदी डोळ्यात प्राण आणून पोस्टमनकाकांची दारात वाट पाहत उभे रहात असू. पोरांनी फकतीही गलका केला तरी कधीही चचडलेले पोस्टमनकाका पाहहले नाहीत. वाड्यातली सगळी पोरंपोरी आम्ही त्यांना वेढून राहायचो. ते एकेकाचं नाव वाचून पोस्ट काडष हातात देत असत.
एकमेकांची खुशाली असो, प्रगती असो, मंगल कायाषची आमंत्रण असो फकंवा अगदी कोणतीही दुुःखद बातमी असो पहहल्यांदा पोस्टाची पेटी ते सवष आपल्या पोटात घ्यायची. संक्ांतीचा ततळगुळ, हदवाळीच्या, वाढहदवसाच्या, नवीन वर्ाषच्या शुभेच्छा, टपाल पेटीतून आपल्यापयंत पोहोचायच्या. राखी पौणणषमेला तरी राखीच्या पाफकटाने टपाल पेटीचं पोट तुडुंब भरून वाहायला
लागत असे. पोस्टकाडष, अंतदेशीयपत्र, पाफकटे, आमंत्रण पत्रत्रका, अशा सवष संदेशांचे लमश्रण ती सहिपणे सामावून घेत असे. अनेक संलमश्र भावभावनाचे केंद्र म्हणिे टपालपेटी. लाखो भारतीयांच्या भावना एकमेकांपयंत पोहोचवणारे स्त्रोत म्हणिे टपाल पेटी. ती म्हणिे पत्ररूपाने जिवलगांच्या ख्याली खुशाली कळवणारा िणू सांताक्लॉिच.
त्यावेळेला घरोघरी िोन नव्हते. त्यामुळे ततने फकती िणांच्या संदेशवाहकाचे काम केले असेल याला गणतीच नाही. स्वतुः पावसात लभिून, उन्हात तापून, थंडीत गारठून सुद्धा ततने तनरपेक्षपणे, अव्याहतपणे आपले कतषव्य एखाद्या कमषयोग्याप्रमाणे वर्ाषनुवर्े बिावलेले आहे. फकती िणांच्या सुखदुुःखात ती सहभागी झाली असेल, फकती िणांचे संदेश दूरवर ततने पोहोचवले असतील. लोकांच्या प्रेमाच्या, रागाच्या, आनंदाच्या, सवष भावनांची ती साक्षीदार असायची. िेव्हा तंत्रज्ञान आिच्या एवढे प्रगल्भ नव्हते तेव्हा दळणवळण साधनांच्या मध्ये ततचे महत्त्वाचे योगदान कोणीही नाकारणार नाही. लोकांच्या भावनांचा प्रवास घडवून आणणे हे काम टपालपेटीने चोख पार पाडले आहे.
माझ्या तर अनेक आठवणी या टपालपेटीशी िोडल्या गेल्या आहेत. आि अचानक त्या सवष आठवणींना उिाळा लमळाला. शाळेत असताना मी एकदा घरात बसून पोस्टकाडाषवरती आईलाच पत्र ललहहले आणण ते पेटीत टाकून आले. दुसरे हदवशी ते पत्र घरी आले तेव्हा मला खूप आनंद झाला.घरातल्यांची प्रततफक्या मिेशीर होती.
लमरिेला आम्ही रहात होतो ततथे समोरच अंबाबाई तालीम संस्था होती. त्या संस्थेच्या दारातच एक टपाल पेटी होती. तालमीच्या पायरीवर चढून टपाल पेटीमधे पत्र टाकणं लहान मुलांना सुद्धा सहि िमण्यासारखे होते. माझी मुलगी पाच वर्ाषची असेल, ततने घरातली आलेली सवष पत्रे गोळा करून त्या टपालपेटीत एक एक करत टाकली होती. आमच्याकडे एक तारेचा टोचा होता त्याला आम्ही आलेली पत्रे टोचून ठेवत असू. दुसरे हदवशी पोस्टमनदादा सगळा पत्रांचा गठ्ठा घेऊन दारात आले. काय हे ताई? काय प्रकार आहे हा? त्यांनी ववचारले. मला पण समिेना की ही पत्रे ततथे कशी गेली? तेवढ्यात माझ्या लेकीने सांचगतले की आई मीच ती सगळी पत्रे टपाल पेटीत टाकली होती. पण पोस्टमनदादा िरा सुद्धा न चचडता परत गेले त्याचे मला खूपच
आश्चयष वाटले. माझ्या लेकाला िॅन्सी ड्रेस स्पधेमध्ये एकदा टपाल पेटी केलेली आठवण पण या तनलमत्ताने तािी झाली.
एकदा पेटीमध्ये एका बाईची पसष. पत्र टाकताना आत पडली. हातातली छोटी पसष होती ती. ततने िवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये िाऊन ही गोष्ट सांचगतली त्यानंतर ज्यावेळेला ती टपाल पेटी उघडणार होती तेव्हा ततला ततथे यायला सांचगतले व पोस्टमन काकांनी ततला ती पसष काढून हदली. ती बाई त्यांचे धन्यवाद मानत राहीली.
आमच्या पररचयातील एक लमलेट्रीतील िवान! िे आता तनवृत्त आहेत. ते सांगत असत की काचगषलला कायषरत असताना ते रोि एक पत्र घरी पाठवत असत.. त्याचे कारण काय तर,आपण सुरक्षक्षत आहोत, जिवंत आहोत हे घरच्यांना समिण्यासाठी. आणण इकडून त्यांची बायको पण त्यांना रोि एक पत्र ललहीत असे. अततशय दुगषम भागात देश सेवेसाठी, तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या आपल्या िवानांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी या टपालपेटीने हे मोठे योगदान त्या काळात हदलेल आहे हे कोणीही नाकारणार नाही.
आमच्या लहानपणी आमच्या वाड्यामध्ये एक म्हातारे मामा यायचे. त्यांचा मुलगा लशक्षणासाठी लांब राहायचा. त्याला पाठवायची पत्रे ते माझ्याकडून ललहून घेत असत व त्याचे आलेले पत्र मला वाचायला लावत असत. आणण एक मिेशीर आठवण म्हणिे कॉलेिमध्ये माझी एक जिवलग मैत्रीण होती,ततचे लग्न ठरले. ततचा नवरा लमललटरी मध्ये होता. ती त्याला पत्रे पाठवायची असायची. पण ततचे अक्षर खूप खराब होते त्यामुळे ती पत्र माझ्याकडून ललहून घ्यायची. पत्र ललहून, पाफकटात बंद करून, ते टपाल पेटीत टाकून येणे, हा एक आमचा मोठा कायषक्मच असायचा. पत्र टपाल पेटीमधे टाकतानाचा ततचा भावपूणष चेहरा नेहमी माझ्या समोर येतो. त्यांच्या ववरह कालावधीमधे टपालपेटी एक िार मोठा दुवा होती.
खरेच टपालपेटीने माणसे िोडण्याचे सुद्धा िार मोठे काम केले आहे असे मला वाटते. पत्रांचे वाचन करणे फकंवा पत्र ललहून घेणे हे सुद्धा काही तनरक्षर लोकांसाठी करावे लागत असे. बऱ्याच हठकाणी स्वतुः पोस्टमन ज्येष्ठांना पत्र वाचून दाखवून मग पुढे िात असत. पोस्टमन हा खेडेगावात तरी कुटुंबाचा एक घटक होऊन राहत असे. आत्ता टपाल पेटी म्हणत असेल, ‘तुम्ही
िोपयंत माझा वापर करत होता तोपयंत तुम्हाला ललहण्याची, वाचनाची सवय होती. आता िक्त एका सेकंदात तुम्ही तुमचा तनरोप मोबाईल मधून हिारो लोकांना पाठवू शकता हे खरे असल तरी त्यामध्ये पत्राची आत्मीयता नाही हे नक्की.’
आि आपल्या हातात मोबाईल आल्यामुळे याचे िारसे महत्त्व वाटणार नाही. पण त्या काळात टपालपेटीने ही उणीव भरून काढून आणण सवांची मने आणण िीवने िोडण्याचे काम केले आहे. एखाद्या हठकाणचा पत्ता सांगताना सुद्धा टपालपेटीचा संदभष देऊन सांचगतले िायचे. सवषसामान्य माणसांचा भारतीय टपाल खात्याच्या सेवेवर पूणष ववश्वास असायचा. त्याकाळात पोस्टमन व सवषसामान्य माणूस यांचे वेगळेच ऋणानुबंध होते व माणुसकीने बांधलेले घट्ट नातं तनमाषण झाले होते. एक पाठववलेले खुशालीचे पत्र चार-आठ हदवसांनी एखाद्या व्यक्तीला लमळाले की पत्र वाचून त्या माणसाच्या चेह-यावर एक वेगळा आनंद समाधान हदसायचा. पोस्टमन यायची वेळ झाली फकंवा एखाद्या पोस्टमन गल्लीत पत्र वाटत असला तरी गल्लीतील माणसं
आपले पत्र आले असेल का म्हणून कधी दारात उभारून पोस्टमनची वाट बघायची. एखादे पत्र अपेक्षक्षत असेल तर कधी एकदा पोस्टमन येऊन हातात टपाल देईल अशी उत्कंठा असायची. टपालपेटी प्रत्येक व्यक्तीच्या िीवनाशी संलग्न होऊन राहहली होती. आता काळ झपाट्याने बदलत आहे. इंटरनेट,मोबाईलचे युग आले आहे. िग एका हाकेच्या अंतरावरती इतके िवळ आले आहे. पण शेिारचा व िवळचा माणूस लांब िात आहे. आिच्या स्माटषिोनच्या युगामध्ये िरी ततचे महत्त्व आपल्याला वाटत नसले तरी एकेकाळी ततने केलेली सेवा तनरपेक्ष कमाषचे उदाहरण म्हणून सतत स्मरणात राहील हे नक्की.